रणबीर-कतरिनाच्या 'जग्गा जासूस'चं पहिलं पोस्टर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2016 11:02 AM (IST)
मुंबई : रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या 'जग्गा जासूस' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. पोस्टरमध्ये दोघे अतिशय विनोदी अंदाजात दिसत आहेत. या पोस्टरमध्ये रणबीर आणि कतरिना शहामृगावर बसलेले असून त्यांच्या आजूबाजूला शहामृहांचं कळप दिसत आहे. यूटीव्ही मोशन पिक्चरने ट्विटर हॅण्डलवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. "अनेकदा पळ काढण्यासाठी शहामृगाची स्वारी हा सर्वात वेगवान मार्ग असू शकतो," असं लिहिलं आहे. https://twitter.com/utvfilms/status/810794812114923520 अनुराग बासू दिग्दर्शित हा सिनेमात 27 नोव्हेंबर 2015 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कलाकारांच्या बिझी शेड्यूलमुळे आता हा सिनेमा 7 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे.