मुंबई : अभिनेत्री हेमा मालिनी काही दिवसांपूर्वी जुळ्या मुलांच्या आजी झाल्या आहेत. हेमा मालिनी यांनी मीडियाशी बोलताना यासंदर्भात पहिली रिअॅक्शन दिली आहे. हेमा मालिनी यांनी आपल्या नातवड्यांच्या येण्याने अत्यंत आनंद झाल्याचं सांगितलं आहे. हेमा मालिनी यांची लहान मुलगी आहनाने काही दिवसांपूर्वी जुळ्या मुलांना जन्म दिला.


हेमा मालिनी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की, "जेव्हा माझं आणि धरमजी यांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि आम्ही लग्न केलं, त्यावेळी आम्ही जराही विचार केला नव्हता की, एक दिवस आमचं कुटुंब एवढं मोठं होईल."


दरम्यान, आहना देओल आणि तिचा पती वैभव वोहरा यांच्या घरी 26 नोव्हेंबरला जुळ्या मुलांचं आगमन झालं. आहनाने जुळ्या बाळांना जन्म दिला ही, बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आहना देओल यांनी आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं होतं की, तिच्या घरी जुळी मुलं आली आहेत. ती प्राउड पॅरेंट बनली आहे.





अहाना देओलने लिहिलं की, "आम्हाला जुळ्या मुली झाल्या आहेत. अस्त्रिया आणि आदिया या दोघींच्या आगमनाची बातमी देताना खूप आनंद होत आहे. 26 नोव्हेंबर 2020. प्राउड पॅरेंट्स अहाना आणि वैभव. एक्साइटेड ब्रदर डॅरियन वोहरा. आजी-आजोबा पुष्पा आणि विपिन वोहरा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, आजी-आजोबा हेमा मालिनी आणि धर्मेंद्र देओल." अहानाच्या या पोस्टवर तिचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.


हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देओल आणि तिचे पती भारत तख्तानी यांनाही दोन मुलं आहे. त्यांच्या मुलीचं नाव आराध्या आहे. जिचा जन्म 2017 मध्ये झाला होता. तसेच मुलाचं नाव मिराया आहे, त्याचा जन्म गेल्या वर्षी झाला होता. ईशा देओल आणि भारत तख्तानी, अहाना देओल आणि वैभव वोहर यांनी 2014 मध्ये आपली लग्नगाठ बांधली होती.