टायगर श्रॉफच्या 'मुन्ना मायकल'चा फर्स्ट लूक रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2016 12:57 PM (IST)
नवी दिल्ली : टायगर श्रॉफच्या आगामी 'मुन्ना मायकल' या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. टायगर या सिनेमात एका पॉप डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. एक गरिब मुलगा मायकल जॅक्सनला आदर्श मानतो आणि तसा डान्सर बनण्यासाठी कसा धडपडतो, यावर या सिनेमाची कथा आधारित आहे. https://twitter.com/iTIGERSHROFF/status/782782586888126464 टायगर या लूकमध्ये मायकल जॅक्सनच्या स्टाईलमध्ये दिसत आहे. टायगरने ट्विटरवर हा फोटो आणि रिलीज डेट शेअर केली आहे. डान्सच्या प्रत्येक स्टेपचा आनंद घेतला, असं कॅप्शन टायगरने दिलं आहे. 'मुन्ना मायकल' पुढच्या वर्षी 7 जुलै रोजी रिलीज होणार आहे. विकी रजनी यांनी सिनेमाची निर्मीती केली आहे. सिनेमाची अभिनेती लवकरच निश्चित केली जाणार आहे.