मुंबई : अभिनेता फरहान अख्तर याने आपल्या आगामी ‘लखनऊ सेंट्रल’ सिनेमाचा पहिला लूक रिलीज केला आहे. सोशल मीडियावरुन सिनेमातील लूक असलेला पहिला फोटो शेअर केला आहे. “ये है किशन मोहन गिरहोत्रा... जेल में इसे 1821 बुलाते हैं”, असं कॅप्शन देत फरहानने हा फोटो इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावर आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. https://twitter.com/FarOutAkhtar/status/889352546346688512 ‘लखनऊ सेंट्रल’च्या या फोटोत फरहान कैद्याची पाटी घेऊन उभा आहे. या पाटीवर लिहिलं आहे, “नाम- किशन मोहन गिरहोत्रा, कैदी नं. -1821 दिनांक-24.7.2017.” रंजीत तिवारी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. 15 सप्टेंबर 2017 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.