लंडन : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानात हजर होता. यावेळी त्याने तिरंग्यासह स्वतःचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला. मात्र या फोटोवरुन त्याला ट्रोल करण्यात आलं.


अक्षय कुमारच्या हातातील झेंडा उलटा होता. त्यामुळे त्याच्या या फोटोवर टीका करण्यात आली. ट्रोलिंगला सुरुवात झाल्यानंतर अक्षय कुमारने हा फोटो डिलीट केला आणि माफी मागितली. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असं तो म्हणाला.

https://twitter.com/akshaykumar/status/889363696400584704

महिला विश्वचषकाचा फायनल पाहण्यासाठी ट्रॅफिकमध्ये अडकून उशीर होऊ नये यासाठी अक्षय कुमार ट्रेनने रवाना झाला. यावेळी त्याने स्वतःचा एक व्हिडीओही शेअर केला होता.

अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी सिनेमा 'गोल्ड'च्या शुटिंगसाठी इंग्लंडमध्येच आहे. शुटिंगमधून वेळ काढून अक्षय कुमार महिला विश्वचषकाचा सामना पाहण्यासाठी गेला होता.