Fighter Box Office Collection Day 2 : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) अभिनीत 'फायटर' (Fighter) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. 'फायटर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.


'फायटर' या सिनेमाची देशभरात चांगलीच क्रेझ आहे. रिलीजआधीपासून चर्चेत असणारा हा सिनेमा पाहायला सिनेरसिक मोठ्या संख्येने सिनेमागृहात जात आहे. 'फायटर'ने 2024 ची धमाकेदार सुरुवात केली आहे. आता प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचाही या सिनेमाला फायदा झाला आहे. 


'फायटर' बॉक्स ऑफिस कलेक्शन (Fighter Box Office Collection)


'फायटर' हा सिनेमा 25 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी फायटरने 22 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 39 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच दोन दिवसांत या सिनेमाने 61.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


'या' देशांमध्ये 'फायटर'वर बंदी


हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा 'फायटर' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. वैमानिकाच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाला अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलमध्ये बहरीन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांमध्ये फायटरवर बंदी घालण्यात आली आहे. 'फायटर' या सिनेमात दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर हवाई हल्ला करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यावर आधारित या सिनेमाचं कथानक आहे.


तगडी स्टारकास्ट असणारा 'फायटर'


'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. तर अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि अक्षय ओबेरॉय हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा बहुचर्चित सिनेमा 2024 गाजवणार असल्याचं म्हटलं जात आहे. रिलीजआधीपासूनच या सिनेमाची चांगलीच चर्चा होती. उत्तम कथानक आणि तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा आहे.


'फायटर' हा 2 तास 46 मिनिटांचा सिनेमा आहे. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे. देशभरात हा सिनेमा 7,537 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती मार्फ्लिक्स पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत वायकॉम 18 ने केली आहे.


संबंधित बातम्या


Fighter Box Office Collection : हृतिकच्या 'फायटर'चं शानदार लॅन्डिंग; बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस