Fatima Sana Shaikh: बॉलिवूडची दंगल गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. फातिमा तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. फातिमा सना शेख ही एका आजाराचा सामना करत आहे. फातिमा सना शेखनं नुकत्याच एका पोस्टमधून या आजाराबाबत चाहत्यांना माहिती दिली.
इन्स्टाग्रामवरील 'क्यू अँड ए' या सेशनमध्ये नेटकऱ्यांनी फातिमाला काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरं फातिमानं दिली. फातिमानं सांगितलं की, ती एपिलेप्सी या आजाराचा सामना करत आहे. एका नेटकऱ्यानं फातिमाला प्रश्न विचारला की, 'तू या आजाराचा कसा सामना करत आहेस?' या प्रश्नाचं उत्तर फातिमानं दिलं, 'मला सपोर्ट करणारे खूप लोक आहे. काही दिवस चांगले असतात पण काही दिवस फारसे चांगले नसतात. माझं कुटुंब, माझे मित्रमैत्रीणी मला सपोर्ट करतात.'
तुला या आजाराबाबत कधी कळालं आणि तू समस्यांचा सामना कशी करतेस? असाही प्रश्न एका नेटकऱ्यानं विचारला. या प्रश्नाला फातिमा सना शेखनं उत्तर दिलं, 'जेव्हा मी दंगल चित्रपटासाठी प्रशिक्षण घेत होतो तेव्हा मला या आजाराचे निदान झाले. ट्रेनिंग दरम्यान मला त्रास झाला आणि नंतर मी थेट हॉस्पिटलमध्ये गेले. मी पाच वर्ष हे नाकारत होते पण आता मी या आजाराचा स्वीकार केला आहे. आता मी या आजारासोबत राहणं आणि याचा सामना करत काम करायला शिकत आहे.'
फातिमा सना शेखनं एक पोस्ट शेअर करुन एपिलेप्सी आजाराबाबत चाहत्यांना माहिती दिली. या पोस्टमध्ये तिनं एपिलेप्सीबाबतचे पाच फॅक्ट्स सांगितले आहेत.
फातिमाने दंगलसोबतच ठग्स ऑफ हिंदूस्थान, लूडो, थार यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. तसेच तिनं लेडिज स्पेशल या मालिकेमध्ये देखील काम केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
'... कारण मी दीपिकासारखी नव्हते'; अभिनेत्री फातिमा सना शेखचा धक्कादायक खुलासा