फरहानकडून हृतिकची पाठराखण, कंगनाला फटकारलं
एबीपी माझा वेब टीम | 08 Oct 2017 08:16 PM (IST)
सात वर्षांचं प्रेम प्रकरण असल्याचा दावा तिने केला. त्याने तिचे आरोप फेटाळून लावले, इतकंच नाही तर स्वतःचा लॅपटॉप, ईमेल आयडीही तपासासाठी दिला, मग तिने सहकार्य का नाही केलं?' असा सवालही फरहानने उपस्थित केला आहे.
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि क्वीन अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या वादात आता अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरने उडी घेतली आहे. हृतिकने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत फरहानने त्याची पाठराखण केली आहे, तर कंगनाला 'लक्ष्य' केलं आहे. फेसबुकवर लिहिलेल्या एका लांबलचक पोस्टमध्ये हृतिक-कंगनाचं नाव न घेता फरहानने निशाणा साधला आहे. 'कोण बरोबर कोण चूक, हे सांगण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. सायबर क्षेत्रातील जाणकार हे प्रकरण तडीस नेतलीच. पण तो पुरुष आणि ती स्त्री या दोघांना मी व्यावसायिकदृष्ट्या चांगलंच ओळखतो.' असं फरहानने पोस्टच्या सुरुवातीला लिहिलं आहे. 'आप की अदालत'मध्ये कंगनाने हृतिकवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर रोशन पिता-पुत्रांनी मौन बाळगलं, मात्र हृतिकने अखेर आपली बाजू मांडून 'माझं मौन म्हणजे माझी दुर्बलता नाही' असं प्रत्युत्तर दिलं होतं. कंगना राणावत …. बोल्ड…. बिनधास्त….आणि बंडखोर अभिनेत्री