मुंबई : 'डॉन' (Don) चित्रपटाच्या प्रत्येक सिक्वेलला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांनी रुपेरी पडद्यावर डॉनची भूमिका साकारली. आता बॉलिवूडला नवा डॉन मिळाला आहे. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा डॉन-3 (Don 3) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. डॉन आणि डॉन 2 चे दिग्दर्शन करणाऱ्या फरहान अख्तरने डॉन 3 चित्रपटाचा टीझर नुकताच शेअर केला आहे.


 ‘डॉन 3’च्या कास्टिंगबद्दल दिग्दर्शकाने सोडले मौन


या चित्रपटात शाहरुखची जागा रणवीर सिंह घेणार असल्याची बातमी समोर आल्यापासून इंटरनेटवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. रणवीरचे चाहते आनंदी असताना, काही लोक त्याच्या चित्रपटातील कास्टिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत आणि काही चाहते त्याला डॉन म्हणून स्वीकारण्यास असमर्थ आहेत. याप्रकरणी आता फरहान अख्तरने मौन सोडले आहे.


शाहरुख खान आणि रणवीर सिंहबद्दल म्हणाला..


नवा डॉन म्हणून रणवीर सिंहच्या निवडीवरून निर्माण झालेल्या प्रश्नांना फरहान अख्तरने सडेतोड उत्तर दिले आहे. वाढता वाद आणि होणाऱ्या ट्रोलिंगवर तो म्हणाला, ‘मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.’ तो पुढे म्हणाला की, 'रणवीर सिंह एक उत्कृष्ट अभिनेता आहे. चित्रपटाच्या या भागासाठी तो परफेक्ट आहे. तो स्वतः या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आणि नर्व्हस आहे.' फरहान पुढे म्हणाला, ‘आम्ही शाहरुख खानसोबत ‘डॉन’ बनवताना या आधीही अशा प्रकारचे प्रश्न आम्हाला विचारले गेले होते आणि ट्रोल देखील केले गेले होते. त्यावेळी सर्वजण म्हणाले की, अमिताभ बच्चनची जागा शाहरूख खान कशी घेणार? पण, त्यानंतर जे सर्व काही घडले ते प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडले.' पुढे तो म्हणाला की, 'रणवीर सिंह खूप छान काम करेल, याचा मला विश्वास आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट आणि चित्रपट माझ्या व्हिजननुसार काम करेल, याची खात्री करण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे.'


रणवीर झाला बॉलिवूडचा तिसरा डॉन


अमिताभ बच्चन यांनी 1978 मध्ये रिलीज झालेल्या चंद्रा बारोट दिग्दर्शित 'डॉन' या चित्रपटात डॉनची भूमिका साकारली. या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यानंतर फरहान अख्तरने दिग्दर्शित केलेल्या 2006 मध्ये रिलीज झालेल्या डॉन चित्रपटात शाहरुख खाननं डॉनची भूमिका साकारली. 2011 मध्ये रिलीज झालेल्या 'डॉन 2' चित्रपटामध्ये देखील शाहरुखनेच डॉनची भूमिका साकारली. आता 'डॉन-3' चित्रपटामध्ये रणवीर सिंह डॉनची भूमिका साकारणार असून तो आता बॉलिवूडचा तिसरा डॉन ठरला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Uorfi Javed: 'तू भारतात पसरवलेली घाण ...', एका व्यक्तीनं दिली धमकी; उर्फी जावेद म्हणाली, 'माझ्या आयुष्यातील...'