Farah Khan on Profession : अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येतो. दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक फराह खान यांनी 'मास्टरक्लास'मध्ये उपस्थितांशी संवाद साधला. फराह खान बॉलिवूडच्या आघाडीच्या दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर पैकी एक आहे.


"आयटम साँगपेक्षा 'अशी' गाणी करणे आवडतात"


फराह खान यावेळी म्हणाली की, गाण्यातून चित्रपटाची कथा पुढे जाणे गरजेचे आहे. आयटम साँगपेक्षा अशी गाणी करणे, मला जास्त आवडतात, ज्यामध्ये कथा पुढे जाते. एक कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून मला ही माझी ताकद वाटते. स्वप्न पाहिली तरच ती पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात येत असते, असंही तिने यावेळी म्हटलं.


कोरिओग्राफी आणि डायरेक्टरची जबाबदारी


कोरिओग्राफी आणि डायरेक्टर या दोन्ही जबाबदाऱ्या माझ्यासाठी लर्निंग प्रोसेस होती, असं फराहने सांगितलं. तिने कोरिओग्राफर म्हणून काम करत असताना दिग्दर्शक म्हणूनच काम करायचं हे पक्के ठरवलं होतं, त्यामुळे ओम शांती ओम सारखा चित्रपट केवळ चौदा दिवसात लिहून पूर्ण झाला, असंही सांगितलं. आपली आवड आणि व्यवसायाची सांगड घालता आली तर नक्कीच उत्तम निर्मिती होते. माझ्यासाठी हीच बाब कायम महत्वाची आहे, असे फराह खानने म्हटलं आहे.


"स्वप्न सत्यात उतरवविण्यासाठी मेहनत करा"


फराह खान पुढे म्हणाली, इतरांसारखे वागण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःचे वेगळेपण जपत काम करत राहणे आवश्यक आहे. तुम्ही जे स्वप्न पाहता, ते सत्यात उतरवविण्यासाठीही प्रचंड मेहनत आणि काम करण्याची तयारी ठेवण्याचा सल्ला तिने यावेळी दिला. आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी संदर्भात स्वतः कारणे देण्यापेक्षा काम करत राहिले पाहिजे. या जगात अशक्य असे काहीच नाही, केवळ आपण विश्वास ठेवत मेहनत करणे आवश्यक आहे, असंह तिने म्हटलं.


'कभी हा, कभी ना' चित्रपट कोरिओग्राफर म्हणून महत्वाचा आहे आणि 'ओम शांती ओम' दिग्दर्शक म्हणून महत्वाचा आहे, असंही फराह खानने सांगितलं. तिने आतापर्यंत चार चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यातील तीन हिट ठरले, तर एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. पण, अपयशाच्या कारणांचे विश्लेषण करून पुन्हा नव्याने कामाला लागलो, तरच आपण पुढे जाऊ शकतो, असा विश्वास फराह खानने यावेळी व्यक्त केला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोनालिसासाठी सौंदर्य ठरला शाप, 12 वर्षांची प्रतीक्षा वाया गेली; इंटरनेट सेन्सेशन बनल्याने कुंभमेळ्यातून माघारी परतण्याची वेळ