मुंबई : बॉलिवूडचा 'मोस्ट बॅचलर' सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. काही वर्षांपूर्वी कॅटरिना कैफ आणि सलमान खान यांची जोडी बॉलिवूडमधील फेव्हरेट जोडी होती. आज ते एकत्रन नाही, मात्र तरीही त्यांच्या चाहत्यांना वाटतं की त्यांनी एकमेकांसोबत लग्न करावं.
काही वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज सलमान आणि कॅटरिना यांनी एकत्र यावं, असं त्यांच्या चाहत्यांना वाटतं. कॅटरिनाने एका मुलाखतीत सांगितलं की, एका चाहत्यांने मी सलमान खानसोबत लग्न करावं अशी विनंती मला केली होती. त्यानंतर मी त्या चाहत्याला 'हम्म्म्म' असा रिप्लाय दिला होता.
मुलाखतीदरम्यान कॅटरिनाला तिच्या लग्नाबाबत विचारलं होतं. या प्रश्नाचं उत्तर देताना कॅटरिनाने म्हटलं की, मला खरंच माहित नाही, माझं लग्न कधी होईल. मात्र जेव्हा मला चांगला मुलगा मिळेल तेव्हा मी लग्न करेल. सलमानबाबत बोलताना कॅटरिनाने म्हटलं की, सलमान अनएक्सपेक्टेड पर्सनॅलिटी आहेत. त्यामुळेच त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण आकर्षक असतो.
सलमान-कॅटरिना यांचं अनेक वर्ष अफेअर होतं. मात्र 2009 मध्ये त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याच निर्णय घेतला. ब्रेक-अपनंतरही त्यांनी एकमेकांसोबत अबोला न धरता अनेक चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केलं. आजही अनेकजण त्यांच्या जोडीला पसंत करतात.
सलमान आणि कॅटरिनाची जोडी लवकरच दिग्दर्शक अब्बास जफरच्या 'भारत' सिनेमात झळकणार आहे. कॅटरिनाआधी या सिनेमासाठी प्रियांका चोप्राचं नाव निश्चित झालं होतं. मात्र वैयक्तिक कारणामुळे प्रियांकाने हा सिनेमा नाकारला आणि हा सिनेमा कॅटरिनाला मिळाला. भारत हा सिनेमा कोरियन सिनेमा 'ओड टू माय फादर'चा रिमेक आहे.
व्हिडीओ - युतीच्या राजकारणाची ब्लॉकबस्टर फिल्म | स्पेशल रिपोर्ट