मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीदुखीनंतर बुधवारी संध्याकाळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. कार्डिअॅकशी निगडीत त्रासामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
संतोषी यांनी सकाळी श्रीदेवी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं होतं. संध्याकाळी छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
राजकुमार संतोषी सध्या साराग्रहीच्या लढ्यावर आधारित 'बॅटल ऑफ साराग्रही' चित्रपटाची जुळवाजुळव करत आहेत. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुडा मुख्य भूमिकेत आहे.
घायल (1990), दामिनी (1993), अंदाज अपना अपना (1994), घातक (1996), पुकार (2000), लज्जा (2001), दि लेजेंड ऑफ भगत सिंग (2002), खाकी (2004), अजब प्रेम की गजब कहानी (2009), फटा पोस्टर निकला हिरो (2013) यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.
'पुकार' चित्रपटासाठी संतोषींना राष्ट्रीय एकतेचा नर्गिस दत्त राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. तर 'दि लेजेंड ऑफ भगत सिंग' राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मानकरी ठरला होता.
प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी नानावटी रुग्णालयात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Feb 2018 11:20 PM (IST)
संतोषी यांनी सकाळी श्रीदेवी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं होतं. संध्याकाळी छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -