Malaika Arora and Arjun Kapoor Break Up:अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे पहिल्यापासूनच बॉलिवूडमधील लोकांच्या नजरेत येणारं कपल आहे. अनेक काळापासून त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु होती. ते वेगळे झाल्याच्या अनेक अफवाही पसरल्या होत्या. आपल्या सिनेमाचं सिंघम अगेन चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी नुकत्याच एका कार्यक्रमात गेलेल्या अर्जुन कपूरला मलायका कुठे आहे? मलायका कशी आहे? असं विचारण्यात आलं त्यावेळी आता मी सिंगल आहे.. असं म्हणाला. गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु होत्या. आता त्यानेच यावर मौन सोडल्याचं दिसलं.
मी सिंगल आहे रिलॅक्स!!
सिंघम अगेन हा रोहित शेट्टी निर्मित सिनेमा 1 नोव्हेंबरला चित्रपटगृहात येणार आहे. या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. याचसाठी अर्जुन कपूर एका कार्यक्रमात प्रमोशनसाठी स्टेजवर उभा असताना मागून आवाज आला.. मलायका कशी आहे...यावर अर्जुन म्हणाला मी सिंगल आहे. relax.. यांनी आता टॉल आणि हँडसम असं म्हणलं जसं ते माझ्या लग्नाची बोलणी करायला जात आहेत.. त्यामुळे बोलत आहे. असं अर्जुन हसत म्हणाला. आता तो मस्करी करत होता की खरचं त्यानं मलायकासोबत ब्रेकअपवर मौन सोडलं हे अर्जुनच जाणे! सोशल मिडियावर त्याचा हा व्हिडिओ सध्या बेफाम व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक प्रतिक्रीयाही केल्या आहेत.
मलायका अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चा
मलायका आणि अर्जुन अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत दिसत नसल्यानं त्यांच्यात काहीतरी बिनसल्याचं बोललं जात होतं. त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चाही गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. गेल्या महिन्यात जेंव्हा तिच्या कुटुंबावर मोठा कठीण प्रसंग ओढवला त्यावेळी अर्जुन तिच्यासोबत दिसला. २०१६ पासून मलायका आणि अर्जुन रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं जातं. काही दिवसांनी त्यांनी सोशल मिडियावरही आपल्या नात्याबद्दल उघडपणे सांगितलं. आता अर्जुन कपूरचा मी सिंगल आहे असं म्हणल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याचं दिसतंय.
हेही वाचा:
Sai Tamhankar : 'होय आम्ही वेगळे झालोय,' सई ताम्हणकर आणि अनिश जोगचं ब्रेकअप, अभिनेत्रीनेच दिली कबुली