Aishwarya Rai Bacchan Birthday: बॉलिवूडनगरीत जेवढं ऑनस्क्रीन केमीस्ट्रीकडे चाहत्यांचं लक्ष असतं तेवढंच पडद्यामागच्या घडणाऱ्या गोष्टींकडेही असतं. अनेकदा बॉलिवूडमध्ये सिनेमाच्या शेवटी हिरो हिरोईन एकत्र येतात आणि हॅपी एंडिंग होते. काही जोड्या मात्र या ऑनस्क्रीन हॅपी एंडींगला अपवाद आहेत. त्यातलीच एक जोडी म्हणजे ऐश्वर्या राय आणि शाखरूख खान यांची. सिनेमांमध्ये या जोडीला काही आनंदी जोडपं होण्याची वेळ आलीच नाही. देवदासमध्ये प्रेमकहाणी आहे पण शेवट मात्र गोड नाहीच! आज आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या ऐश्वर्यानं शाहरुखसोबत असे कोणकोणते चित्रपट केलेत ज्यात या जोडीचं हॅपी एंडींग नाही?
ऐश्वर्या राय बच्चनचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या सौंदर्यानं आणि अभिनय कौशल्यानं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी ती भारतात आणि परदेशातही ओळखली जाते. त्यांनी चित्रपट जगताला अनेक चांगले चित्रपट भेट दिले आहेत. आज ती आपला 52 वाढदिवस साजरा करत आहे.
देवदासची पारो
देवदास या सिनेमात ऐश्वर्यानं केलेली पारोची भूमिका आजही अनेकांच्या मनात आहे. देवदास या चित्रपटानं इतिहास तर रचला पण देवदास आणि पारो काही एकत्र येऊ शकले नाहीत. देवदास आणि पारोची लव्हस्टोरी तर आहे पण शेवट मात्र आनंदी नाही.
ए दिल है मुश्कील
रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय यांची स्टारकास्ट असणारा ए दिल है मुश्कील या चित्रपटाचं कथानक जरी रणबीर आणि अनुष्काभोवती फिरत असले तरी ऐश्वर्याचे आणि शाखरुख या सिनेमात वेगळे झालेले जोडपे दाखवण्यात आले आहे. एकतर्फी प्रेमावर आधारलेल्या चित्रपटात ऐश्वर्या आणि शाहरुखची जोडीची हॅपी एंडींग नाही.
मोहोबत्तें सिनेमातही लव्ह स्टोरी विरहाचीच
अमिताभ बच्चन शाखरुख खान यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या मोहोब्बते या चित्रपटात शाहरुखच आणि ऐश्वर्याचे प्रेम असते. पण ऐश्वर्या या चित्रपटात ती या जगात नसल्याचे दाखवण्यात आले आहे.
जोश सिनेमात तर ऐश्वर्या शाहरुखची बहीण
शाहरुख आणि ऐश्वर्या या दोघांच्या जोडीला अनेक चित्रपटांमध्ये शेवटपर्यंत ऑनस्क्रीन प्रेमाची साथ मिळाली नाही. अनेक चित्रपटांमध्ये ते जोडपं म्हणून दिसले. पण एका चित्रपटात ऐश्वर्यानं शाखरुखच्या बहिणीचा रोल केलाय. जोश सिनेमात ती शाहरुखची बहीण होती.