दिग्दर्शक गिरीष कुलकर्णी यांच्या जाऊंद्याना बाळासाहेब या सिनेमातील हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.
'बघ तरी गोडीत, लक्झरी गाडीत आलोया मै हू डॉन, बेबी ब्रिंग इट ऑन, आलिंगनाला' असे या गाण्याचे बोल आहेत.
हे गाणं अजय - अतुलने लिहिलं असून, या गाण्याला त्यांनीच संगीत दिलं आहे, तर अजय गोगावलेने हे गायलं आहे.
जाऊंद्याना बाळासाहेब हा सिनेमा 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता भाऊ कदम, गिरीष कुलकर्णी, सई ताम्हणकर, मोहन जोशी, मनवा नाईक प्रमुख भूमिकेत आहेत.
पाहा 'बेबी ब्रिंग इट ऑन' गाण्याचा व्हिडीओ