मुबंई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीनं नोटीस बजावली आहे. यांच्यासोबत अभिनेत्री जुही चावला आणि तिच्या पतीलाही ईडीनं फेमा कायद्याअंतर्गत नोटीस धाडली आहे.


शेअर विक्रीत फेमा कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान, गौरी खान, जुही चावला आणि तिचा पती जय मेहता यांच्यावर संघाच्या शेअर्सची किंमत कमी करुन त्याची गुंतवणूक दाखवून पैशाची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. सध्या याप्रकरणी केस सुरु असून त्याच प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.



केकेआरचे मालकी हक्क शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेन्टकडे आहेत. तर मेहता ग्रुपचे जय मेहता आणि जुही चावला हे त्याचे पार्टनर आहेत. तर संघाच्या संचालकपदी शाहरुखची पत्नी गौरी खान आहे. त्यामुळे या चौघांनाही ईडीनं नोटीस बजावली आहे.

या सर्व प्रकरणी ईडीकडे केस सुरु आहे. त्याचसंबंधी ईडीनं कारणे दाखवा नोटीस धाडली आहे. या नोटीसला शाहरुखसह इतरांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. दरम्यान, याआधीही ईडीनं शाहरुखची चौकशी केली होती.