Dunki Box Office Collection Day 3 : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 70 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. शाहरुखच्या 'डंकी'ने छप्परफाड कमाई केली आहे.
'डंकी' या सिनेमाची शाहरुखच्या चाहत्यांसह सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ होती. अखेर आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शाहरुखचे 2023 मध्ये तीन सिनेमे प्रदर्शित झाले. 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) या सिनेमांचा यात समावेश आहे. अद्याप डंकीने जवान आणि पठाणचा रेकॉर्ड ब्रेक केलेला नाही.
'डंकी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Dunki Box Office Collection)
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,'डंकी' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 29.2 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 20.5 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 26 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 75.32 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'डंकी' या सिनेमाने जगभरात 103 कोटींचा गल्ला पार केला आहे. 'डंकी' हा सिनेमा किती कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'सालार' पुढे 'डंकी' पडला मागे
शाहरुख खानचा 'डंकी' आणि प्रभासचा 'सालार' हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आहेत. डंकी 21 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झाला आहे. तर सालार हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सालारने कमाईच्या बाबतीत डंकीला मागे टाकलं आहे.
'डंकी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी सांभाळली आहे. 'डंकी' या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं आहे. या सिनेमात शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन ईरानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 120 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
वीकेंडला 'डंकी' हा सिनेमा चांगलीच कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'डंकी'आधी राजकुमार हिरानी यांनी '3 इडियट्स', 'पीके','संजू' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'डंकी' हा सिनेमा 4000 ते 4500 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या