Drishyam 2 Box Office Collection : 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) मुख्य भूमिकेत आहे. आता या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या दोन वर्षात अजयचा सुपरहिट होणारा हा तिसरा सिनेमा आहे. 


'दृश्यम 2'चा बॉक्स ऑफिसवर धमाका


'दृश्यम 2' हा सिनेमा 18 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. गेल्या सात दिवसांपासून हा सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी या बहुचर्चित सिनेमाने 9 कोटींचा गल्ला जमवत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने 104 कोटींची कमाई केली आहे. 


'दृश्यम 2'ची कमाई : 



  • पहिला दिवस - 15.38 कोटी

  • दुसरा दिवस - 21.59 कोटी

  • तिसरा दिवस - 27.17 कोटी

  • चौथा दिवस - 11.87 कोटी

  • पाचवा दिवस - 11 कोटी

  • सहावा दिवस - 9.55 कोटी

  • सातवा दिवस - 9 कोटी

  • एकूण कमाई - 104 कोटी


'दृश्यम 2' या सिनेमाने आता 100 कोटींचा टप्पा पार केला असला तरी लवकरच अनेक रेकॉर्ड्स करण्यासाठी हा सिनेमा सज्ज आहे. रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात हा सिनेमा 150 ते 200 कोटींचा टप्पा पार करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रिलीजच्या सहा आठवड्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. 




'दृश्यम 2' या सिनेमात अजय देवगण, तब्बू, श्रेया सरन आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून अजय पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. 50 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थरार-नाट्य पाहायला मिळेल. लवकरच हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. 


संबंधित बातम्या


Drishyam 2 Collection Day 5 : 'बॉक्स ऑफिसवर दृश्यम 2'चा बोलबाला; जाणून घ्या पाच दिवसांची कमाई...