Dream Girl 2 Poster:  अभिनेता आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान हा त्याच्या ड्रीम गर्ल-2 या चित्रपटाचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो. या व्हिडीओमध्ये पूजाचा आवाज ऐकू येत होता. पण आता ड्रीम गर्ल-2 मधील पूजाचा लूक आयुष्माननं सोशल मीडियावर शेअर केला आहे. पूजाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) या चित्रपटामध्ये आयुष्मान हा डबल रोल साकारणार आहे. आयुष्माननं शेअर केलेल्या फोटोमध्ये आयुष्मान हा पूजाच्या लूकमध्ये दिसत आहे. आयुष्माननं शेअर केलेल्या फोटोमध्ये पूजा ही लिपस्टिक लावताना दिसत आहे तर आरशामध्ये आयुष्मान लिपस्टिक घेऊन उभा असलेला दिसत आहे.  या फोटोला आयुष्माननं कॅप्शन दिलं, 'ही तर फक्त पहिली झलक आहे.' आयुष्मान शेअर केलेल्या या पूजाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.






कधी रिलीज होणार 'ड्रीम गर्ल 2'?



एकता आर कपूर आणि शोभा कपूर निर्मित 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट  25 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात आयुष्मानसोबतच अनन्या पांडे, परेश रावल, अन्नू कपूर, विजय राज आणि राजपाल यादव हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.


काही दिवसांपूर्वी आयुष्माननं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये दिसले की, पूजा ही पठाण आणि भाईजानसोबत बोलत आहे.






'ड्रीम गर्ल-2' हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटामधील आयुष्मानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता  'ड्रीम गर्ल-2' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  हा चित्रपट राज शांडिल्य यांनी दिग्दर्शित केला आहे. 


 इतर महत्वाच्या बातम्या:


Dream Girl 2: पूजामुळे सलमान खान अजूनही आहे बॅचलर? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण