अहमदनगर : पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावरील सिनेमाचं प्रमोशन अहमदनगरला करण्यात आलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत हा प्रमोशन सोहळा पार पडला.


12 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यावेळी माँ तुझे सलाम कार्यक्रमात आदर्श मातांना सन्मानित करण्यात आलं. सिनेमा केवळ मनोरंजनाचं साधन नसून परिवर्तनाचं माध्यम असल्याचं अण्णांनी म्हटलंय. सिनेमातून मुलांवर प्रभाव पडल्यास अनेक तात्याराव निर्माण होतील, असंही ते म्हणाले.

सध्या अनेक संस्कार केंद्र आहेत, मात्र तात्या लहाने तयार झाले का, असा सवाल अण्णांनी उपस्थित केला. तर कुटुंब हे संसार केंद्र झाली पाहिजे, असं म्हणत आईच्या संस्कारातून मी घडल्याचं अण्णांनी सांगितलं.

समाजाच्या चौकटीत कसं वागायचं हे आईने शिकवलं. आई गेल्यावर आईचं महत्व समजतं, असंही अण्णांनी म्हटलं. त्याचबरोबर स्वतःसाठी जगणारे कायम मरतात, मात्र समाजासाठी मरणारे कायम जगतात, असा संदेशही अण्णांनी दिला.

पाहा सिनेमाचा ट्रेलर :