पिंपरीः मनसेने 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाच्या निर्मात्यांसोबत तोडपाणी केलं की काय, अशी शंका येते, असं सांगत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि सिनेमाच्या निर्मात्यांची बैठक झाली. यामध्ये लष्कर निधीसाठी 5 कोटी रुपये देण्याच्या अटीवर 'ऐ दिल है मुश्किल'च्या रिलीजला परवानगी देण्यात आली.

''ए दिल.. वादः मुख्यमंत्री, राज ठाकरेंच्या बैठकीची माहिती सार्वजनिक करा''


मनसेने आजवर एकही मुद्दा तडीला नेला नाही. मात्र यावेळी देशाची किंमत पाच कोटी केली का, असा सवाल अजित पवारांनी केला. सिनेमात पाकिस्तानी कलाकार असल्याने मनसेने अगोदर कठोर भूमिका घेत प्रदर्शनाला विरोध केला होता. मात्र बैठकीत काढलेल्या तोडग्यावर टीका होत आहे.

फडणवीसांनी 5 कोटींना देशभक्ती विकत घेतली : शबाना आझमी


मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनीही या बैठकीवर टीका केली आहे. या बैठकीतील तपशील सार्वजनिक करा, अन्यथा कोर्टात जाऊ, असा इशारा निरुपमांनी दिला आहे.

संबंधित बातम्याः


सैन्याला स्वत:चा स्वाभिमान, खंडणीचा पैसा नको, उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला


पाकिस्तानी कलाकारांवरची बंदी योग्यच : मुख्यमंत्री


'ऐ दिल है मुश्किल'चा तिढा सुटला, सिनेमा रिलीज होणार


..म्हणून 'ऐ दिल है मुश्किल'ला परवानगी : राज ठाकरे


'ऐ दिल..'बाबत रणनीतीसाठी मनसेची कृष्णकुंजवर खलबतं