मुंबई: टीव्ही मालिका 'बालिका वधू' प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर मनोरंजन विश्वाला चांगलाच धक्का बसला आहे. पण असं काही पहिल्यांदाच घडलेलं नाही की, या इंडस्ट्रीतील अभिनेत्रींनी असं पाऊल उचललं आहे. याआधी देखील बॉलिवूडमध्ये अशा घटना घडल्या आहेत.

 

मात्र, साधारण 23 वर्षापूर्वी बॉलिवूड विश्वात एक अशी घटना घडली जिने साऱ्यांनाच हादरा बसला होता. दिव्या भारतीचा मृत्यू...

 

90च्या दशक म्हटलं तर दिव्या भारती हे नाव सगळ्यांचाच ओठावर येतं. अवघ्या 19 व्या वर्षाच्या या अभिनेत्रीनं अगदी कमी वयात यशाची शिखरं गाठली होती. जे मिळविण्यासाठी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना आयुष्य खर्ची घालावं लागतं.

 

 



 

90च्या दशकात अभिनेत्रींच्या बाबतीत दिव्या पहिल्या क्रमांकावर विराजमान होती. पण एवढ्या लहान वयात तिचा झालेला अचानक मृत्यू सगळ्यांनाच हैराण करणारा होता.

 

दिव्याचा मृत्यू आजच्या दिवशी 1993 रोजी झाला होता. तिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. दिव्याचा पाचव्या मजल्यावरुच्या इमारतीवरुन पडून मृत्यू झाला होता. पण तिच्या खाली पडण्याचं नेमकं कारण आजही समजू शकलेलं नाही. 1974 साली जन्मलेल्या दिव्यानं 1992 साली प्रसिद्ध सिनेनिर्मात साजिद नाडियवालासोबत लग्न केलं होतं.

 

दिव्याचं खरं नाव सना होतं. लग्नानंतर दिव्यानं आपलं आडनावही बदललं होतं. पण लग्नाच्याच एका वर्षानंतर दिव्याचा मृत्यू झाला. आजही दिव्याचा मृत्यू हे एक 'गूढ' बननू राहिलं आहे. काही लोकांच्या मते, दिव्यानं आत्महत्या केली तर काहींच्या मते, तिला कुणीतरी धक्का देऊन पाचव्या मजल्यावरुन खाली फेकलं. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला.

 

 



 

दिव्यानं तेलुगू सिनेमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये दिव्यानं 'विश्वात्मा' सिनेमामधून पदार्पण केलं होतं. बॉलिवूडमधील आपल्या अवघ्या तीन वर्षाच्या कालावधीत दिव्यानं जवळजवळ 21 सिनेमात काम केलं होतं.

 

दिव्या भारतीनं 'दिवाना' आणि 'शोला और शबनम' यासारख्या सुपरहिट सिनेमातून काम केलं होतं. ऋषी कपूर आणि शाहरुख सारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत तितक्याच ताकदीनं काम केलं होतं.

 

दिव्या भारतीवर चित्रित झालेली गाणी आजही आपण सहजपेण गुणगुणतो...

 

ऐसी दिवानगी:



पायलिया:

https://www.youtube.com/watch?time_continue=411&v=FyStni9ZeYc

तेरी उम्मीद तेरा इंतजार:

https://www.youtube.com/watch?time_continue=379&v=qCMmWTLKWnI

तू पागल प्रेमी आवारा: