Avatar Sequels New Release Date : 'अवतार' (Avatar) या सिनेमाची जगभरातील सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'अवतार' आणि 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar: The Way of Water) हे दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची चाहत्यांना उत्सुकता आहे. पण निर्मात्यांनी आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
जेम्स कैमरुन दिग्दर्शित 'अवतार'चे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी झाले आहेत. चाहत्यांना आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी डिज्नीने 'अवतार'च्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या भागांच्या रिलीज डेटची घोषणा केली होती. पण आता या सिनेमांची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.
'अवतार' 3' कधी प्रदर्शित होणार? (Avatar 3 Release Date)
'अवतार 3' (Avatar 3) हा सिनेमा आधी 20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. तर 'अवतार 4' हा सिनेमा 18 डिसेंबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. तसेच 'अवतार 5' हा सिनेमा 22 डिसेंबर 2028 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण डिज्नीने आता या सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. 'अवतार 3' हा सिनेमा 2026 मध्ये जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
'अवतार'च्या सीक्वेलच्या रिलीज डेटबद्दल जाणून घ्या...
'अवतार 3' हा सिनेमा 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 4 डिसेंबर 2029 मध्ये 'अवतार 4' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अवतार 5' हा सिनेमा 2031 मध्ये रिलीज होणार आहे.
'या' कारणाने पुढे ढकलली 'अवतार 3'ची रिलीज डेट
डिज्नीने दिलेल्या माहितीनुसार, थंडरबोल्ट्स आणि ब्लेड सारखे मार्वलचे सिनेमे 2025 मध्ये प्रदर्शित होत असल्याने 'अवतार 3'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. निर्माते जॉन लैंडू यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच 'अवतार' या बहुचर्चित सिनेमाच्या सीक्वेलसाठी निर्मात्यांना थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे या सिनेमांचे सीक्वेल पुढे ढकलण्यात आले आहेत.
जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यशाचा खरा चेहरा एकच
'अवतार' (Avatar), 'अवतार 2' (Avatar 2) आणि 'टायटॅनिक' (Titanic) या सिनेमांचा समावेश जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत होतो. महत्त्वाची बाब म्हणजे, जेम्स कॅमरॉनने (James Cameron) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. जेम्स कॅमरॉनने आपल्या अनोख्या दिग्दर्शन शैलीने जगभरातील सिने-रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. 'अवतार 2' या सिनेमाने 'टायटॅनिक'चा रेकॉर्ड ब्रेक केला असला तरी अद्याप या सिनेमाला मार्वल स्टुडिओजच्या 'एवेंडर्स एंडगेम' (Avengers Endgame) सिनेमाला मागे टाकता आलेलं नाही.
संबंधित बातम्या