Swapnil Mayekar Death: लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर (Swapnil Mayekar) यांचे निधन झाले आहे. गेले काही महिने ते आजारी होते. त्यांचा मराठी पाऊल पडते पुढे (Marathi Paul Padate Pudhe) हा चित्रपट उद्या (5 मे) प्रदर्शित होणार होता. पण त्याआधीच स्वप्नील मयेकर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मराठी पाऊल पडते पुढे हा स्वप्नील मयेकर यांचा स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होते. स्वप्नील मयेकर यांनी वयाच्या 46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
स्वप्नील मयेकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असे कुटुंब आहे. स्वप्निल यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यांच्या निधनानं अता मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
स्वप्नील मयेकर यांचा मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट 5 मे रोजी म्हणजेच उद्या रिलीज होणार आहे. पण या चित्रपटाच्या रिलीज आधीच स्वप्नील मयेकर यांचे निधन झाल्यानं या चित्रपटाच्या टीमवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता चिराग पाटील आणि अभिनेत्री सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, अभिनेते सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी या कलाकारांनी मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाच काम केलं आहे. स्वप्नील मयेकर यांनी त्यांच्या मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
'मराठी पाऊल पडते पुढे' येणार प्रेक्षकांच्या भेटीस
'मराठी पाऊल पडते पुढे' हा एका धडाडी तरुण उद्योजकाची कथा आहे. अॅक्शन, इमोशन्स आणि दर्जेदार डायलॉग्ज असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "मराठी पाऊल पडते पुढे" सिनेमाचे कथानकमराठी तरुणांनी उद्योगक्षेत्रात यावे यावर बेतलेले असल्याने प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. सिनेमातील "हाऊ पोऱ्या अनेर काठणा" हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. "हाऊ पोऱ्या अनेर काठणा" हे गाणं चिराग पाटीलवर चित्रित झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: