मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपची काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. त्यानंतर अनुराग कश्यपची अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. आता अँजियोप्लास्टीनंतरचे काही फोटो समोर आले आहेत. त्याची मुलगी आलिया कश्यपने इंस्टाग्राम स्टेटसवर अनुरागचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अँजियोप्लास्टीनंतरचा अनुरागचा हा लूक पाहून चाहते मात्र आश्चर्यचकित झाले आहेत. कारण या व्हिडीओमध्ये अनुरागला ओळखणंही कठीण होतंय.
अनुरागची मुलगी आलियानं एक छोटीशी क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये अनुराग कश्यप खूप वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे. त्याने निळ्या रंगाचं टीशर्ट वेअर केलं आहे. त्याच्या गळ्यात मास्त लटकलेलं आहे. कॅमेऱ्याकडे पाहून तो म्हणतोय की, "I am so blind" आणि त्यानंतर काही मुलींच्या हसण्याचा आवाज येतो. खरंत अनुरागचा हा लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण आलियानं शेअर केलेला हा व्हिडीओ नीट पाहिला तर लक्षात येतं की, तिनं हा व्हिडीओ तयार करताना इन्स्टाग्राम रिल्सचा वापर केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यपच्या छातीत दुखत होतं. त्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. रिपोर्टमधून त्याच्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस असल्याचं समोर आलं. ज्यानंतर डॉक्टर्सनी अँजियोप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता.
चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने आपला आगामी चित्रपट 'दोबारा'ची शुटींग पूर्ण केली आहे. या चित्रपटात तापसी पन्नूसोबत 'थप्पड़'मधील वेल गुलाटी स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट एक सस्पेंस थ्रिलर असणार आहे. तपासी पन्नू या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. तर अनुराग कश्यपसोबत तापसीचा हा तिसरा चित्रपट असणार आहे. यापूर्वी अनुरागसोबत तापसीनं 'सांड की आंख' आणि 'मनमर्जियां' हे चित्रपट केले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :