Dev Anand: बॉलिवूडच्या उत्कृष्ट कलाकारांच्या यादीत अभिनेते देव आनंद यांचा समावेश होतो. देव आनंद यांनी जवळपास सहा दशके आपल्या कर्तृत्वानं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय. हिंदी चित्रपटांमधून विविध धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या देव आनंद यांच्या संवाद कौशल्याचेही अनेक चाहते आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये देव आनंद यांचं नाव आवर्जुन घेतलं जायचं. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर व्हायचे. मात्र, देव आनंद यांना काळा रंगाचा कोट घालण्यास कोर्टानं बंदी घातली होती? याची खूप कमी लोकांना माहिती असेल. यामागचं नेमकं कारण काय? हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उस्तुक झाले आहेत. 


देव आनंद यांचा अंदाज त्या काळात खऱ्या अर्थाने खूप चर्चेत होता. परंतु, त्यांच्या काळ्या रंगाच्या कोटानं त्यांना वेगळीच प्रसिद्धी मिळवून दिली होती. ज्यावेळी देव आनंद काळा कोट घालून सार्वजनिक ठिकाणी बाहेर जायचे, तेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक वेडे व्हायचे. त्याच्या काळ्या रंगाच्या कोटानं आणि पांढऱ्या शर्टानं प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्या काळात काळ्या रंगाचा कोट घालणाऱ्या या अभिनेत्यावर अनेक तरुणी घायाळ झाल्या होत्या. एवढंच नव्हे तर, आपल्या आवडत्या अभिनेत्यापोटी त्या कोणतंही संकट ओढवून घेण्यासाठी, इमारतीवरुन उडी मारण्यासाठीही तयार असायच्या. 


लोकांमध्ये देव आनंदची क्रेझ पाहता कोर्टानं त्यांच्या कपड्यावर बंदी घातली होती. त्यांना सार्वजनिक ठिकाणी काळ्या रंगाचा कोट घालण्यास मनाई करण्यात आली होती. कोर्टानं एखाद्या अभिनेत्याला त्याच्या कपड्यावरून बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ असेल. देव आनंद यांनी 1946 मध्ये 'हम एक हैं' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. मात्र, हा चित्रपट फ्लॉप झाला होता. पण 1948 मध्ये देव आनंदच्या 'जिद्दी' या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटानंतर देव आनंद रातोरात स्टार बनले.


देव आनंद यांचे खरे नाव धर्मदेव पिशोरीमल आनंद होते. त्यांनी 1942 मध्ये लाहोरमध्ये इंग्रजी साहित्यात पदवी पूर्ण केली होती. त्यांना पुढे शिक्षण घ्यायचे होते. परंतु, त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवण्यासाठी पैसे नसल्याचं सांगितलं. तसेच पुढे शिक्षण घ्यायचं असेल तर नोकरी करण्याचा सल्ला दिला. त्यांचा येथूनच बॉलिवूडचा प्रवास सुरु झाला. त्यांनी 1943 साली मुंबई पाऊल ठेवलं आणि त्यांची स्वप्न सत्यात उतरली. ज्यावेळी ते मुंबईत आले, तेव्हा त्यांच्याकडं फक्त 30 रुपये होते आणि राहायलाही जागा नव्हती, असे सांगितलं जातं. मात्र, या कठीण परिस्थितीचा सामना करत त्यांनी उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी छाप सोडलीय


हे देखील वाचा- 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha