मुंबई : बॉलिवूडमध्ये सर्जरीची क्रेझ अतिशय वाढली आहे. मग ती नाकाही, ओठांची असो वा गालाची. आता यादीत अभिनेत्री श्रीदेवीचंही नाव अॅड झालं आहे. मुंबईमध्ये एका कार्यक्रमात श्रीदेवीने पती बोनी कपूरसह हजेरी लावली. पण यावेळी तिच्या चेहऱ्यात बदल जाणवत होता.


सोशल मीडियावर व्हायरल झालेले या कार्यक्रमातील श्रीदेवीचे फोटो पाहून तिने लिप जॉब केल्याचं म्हटलं जात आहे. परंतु हे लिप जॉब बिघडल्याची प्रतिक्रिया नेटीझन्स देत आहेत.

दिग्दर्शक अनुराग बासूने केलेल्या सरस्वती पुजेसाठी श्रीदेवी आली होती. गॉगल आणि कॅज्युअल लूकमध्ये श्रीदेवीने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?



पण यावेळी तिच्या बदललेल्या ओठांच्या आकारावर सगळ्यांच्या नजरा जात होत्या. तिने लिप सर्जरी केल्याचं म्हटलं जात आहे.

याबाबत विचारलं असता, "मी कोणतीही सर्जरी केली नसल्याचं ती म्हणाली. मी आरोग्यदायी आयुष्य जगते. पॉवर योगा करते. शिवाय समतोल आहार घेते," असंही तिने सांगितलं.

दरम्यान, श्रीदेवीची मुलगी जाह्नवी कपूर 'सैराट'चा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जाह्नवीनेही लिप सर्जरी केल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी होतं.