Dibakar Banerjee on Sushant Singh Rajput Death :  दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी (Dibakar Banerjee) सध्या त्यांच्या 'लव्ह सेक्स और धोखा-2' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट 19 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या त्याचे प्रमोशन सुरू आहे. दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत दिबाकरने दिवगंत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनावर भाष्य केले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या आरोपांवरही दिबाकरने मनातील खदखद बोलून दाखवली. 


सुशांतचा मृत्यू हा कट असल्याचे सांगणे म्हणजे...


'लव्ह सेक्स और धोखा-2'चे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीने नुकतीच सिद्धार्थ काननला मुलाखत दिली. यादरम्यान दिबाकरला त्याच्या चित्रपटासह सुशांत सिंग राजपूतचाही उल्लेख केला. सुशांत सिंह राजपूतने दिबाकरच्या 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी' या चित्रपटात काम केले होते. त्यामुळे दिबाकरचे सुशांतसोबत खास बॉन्डिंग आहे. 


सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत दिबाकरने सुशांतचे कौतुक केले. मात्र, सुशांतची आत्महत्या हा कट असल्याच्या थेरीवर दिबाकरने नाराजी व्यक्त केली. 


सुशांतचे जेव्हा निधन झाले, त्यावेळी त्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत बरीच चर्चा सुरू होती. अशा परिस्थितीत मला स्वत:ला अशा गोष्टींपासून दूर राहावे लागले.  मी सर्व काही पाहत होतो आणि ऐकत होतो. एकानेही सुशांतच्या मृत्यूमुळे आपण एक तरुण, प्रतिभावंत कलाकार गमावला आहे, असे म्हटले नाही. 


लोकांनी फक्त मसालेदार गॉसिपच केले...


दिबाकरने मुलाखतीत पुढे म्हटले की, त्याच्या मृत्यूवर कोणीही शोक व्यक्त केला नाही. लोक कायमच मसालेदार गॉसिपच्या शोधात आणि गॉसिपिंग करताना दिसले. त्यामुळे मला या परिस्थितीतून दूर जावे लागले. 'आम्ही सुशांतला मिस करतोय' असे कोणी म्हणत नव्हते. 


इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नसलेल्या आऊटसाइडर कलाकाराने टीव्ही मालिकेत कसा अभिनय केला आणि नंतर चित्रपटांमध्ये पदार्पण कसे केले याबद्दल कोणीही बोलत नव्हते. सुशांतला कोणी ड्रग्ज दिलं, त्याचा खून कोणी केला, या षडयंत्राचा अंदाज प्रत्येकजण लावत होता. सुशांतची  शोकसभा कुठे आहे? त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी त्याच्या चित्रपटांचे स्क्रिनिंग आयोजित करून त्यावर चर्चा करायला हवी होती. त्यांच्या सर्व चांगल्या आठवणी आपण का जपत नाही? असा सवालही दिबाकरने उपस्थित केला. 


इतर संबंधित बातम्या :