मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिया स्टेजवर हुंदके देऊन रडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिया मिर्झा जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये उपस्थित होती. त्यादरम्यान क्लायमेट एमरजन्सी म्हणजेच, पर्यावरण आणीबाणीविषयी बोलताना दिया मिर्झाला स्टेजवरच रडू कोसळलं आणि ती हुंदके देऊन रडू लागली. दिया मिर्झाचा हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिया दिवसागणिक होणाऱ्या पर्यावरणाच्या आणीबाणीविषयी बोलताना रडू लागली. त्यावेळी ती म्हणाली की, कोणचंही दुःख, वेदना समजून घ्या आणि आपल्या अश्रूंना वाट करून द्या.'
दिया मिर्झा पुढे बोलताना म्हणाली की, 'ही गोष्ट समजून घ्या, पूर्णपणे समजून घ्या, हे सुंदर आहे, हीच आपली खरी ताकद आहे. हेच आपण आहोत आणि हा कोणताही परफॉर्मेंस नाही.' तेव्हा दिया मिर्झाला एका व्यक्तीने टिश्यू पेपेर आणून दिले. त्यावर ती म्हणाली की, 'धन्यवाद, मला पेपरची आवश्यकता नाही.' दिया मिर्झाचं हे बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटाने तिचं कौतुक केलं.
अभिनेत्री दिया मिर्झाचा हा व्हिडीओ अनेक लोक लाईक करत असून त्यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करत आहेत. दरम्यान, दिया मिर्झा स्वतः पर्यावरणप्रेमी असून ती अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत असते. एवढचं नाहीतर वाढत्या प्रदूषणाबाबत अभिनेत्री आपले विचार सोशल मीडिया फॅन्ससोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील आरे जंगल तोडण्याच्या प्रकरणीही तिने ठाम भूमिका घेत विरोध केला होता. यासंदर्भातील आंदोलनातही ती सहभागी झाली होती.
रविवारी 71व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील माहिम बीचवर चित्रपट निर्माती प्रज्ञा कपूर यांनी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहीमेला आपलं समर्थन देण्यासाठी दिया मिर्झा, मृणाल ठाकुर, करण वाही आणि मनीष पॉल यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. इंटरनेटवर या स्वच्छता मोहीमेचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सेलिब्रिटी स्वच्छता करताना दिसत आहे.
संबंधित बातम्या :
फक्त कलाकारांनीच भूमिका का घ्यायची, सामान्य माणसांनीही भूमिका घ्यावी : अतुल कुलकर्णी
आमिरच्या एका शब्दावर खिलाडी अक्षयने बदलली 'बच्चन पांडे'ची रिलीज डेट