मुंबई : सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या युझर्ससाठी ढिंच्यॅक पूजा हे नाव नवीन नाही. 'सेल्फी मैने ले ली आज'नंतर पूजाचा 'दिलोंका शूटर है मेरा स्कूटर' हा व्हिडिओ रिलीज झाला. मात्र आता याच गाण्यामुळे ती अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दिल्ली वाहतूक पोलिस ढिंच्यॅक पूजावर कारवाई करण्याची शक्यता आहे. तिच्या गाण्यामुळे ही कारवाई होणार नसून तिने स्कूटर चालवताना वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे आहे. व्हिडिओत स्कूटर चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे तिच्यावर कारवाई होणार आहे.

खरं तर दिल्ली पोलिसांनी तिला नियम मोडताना पकडलं नाही. मात्र एका ट्विटर यूझरने दिल्ली पोलिसांना टॅग करुन ढिंच्यॅक पूजाची तक्रार केली.

मोहित सिंह नावाच्या व्यक्तीने पूजाचा हेल्मेट न घालता स्कूटर चालवतानाचा फोटो ट्वीट केला. 'ही मुलगी विदाऊट हेल्मेट स्कूटर चालवत आहे आणि जोरजोराने गाणी गात आहे' असं मोहितने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

https://twitter.com/mohit_news24/status/879597029273378816

विशेष म्हणजे अवघ्या 8 मिनिटांत पोलिसांनी त्याच्या ट्वीटची दखल घेतली. या घटनेची तारीख, वेळ आणि जागा सांगा, आम्ही योग्य ती कारवाई करु, असा रिप्लाय पोलिसांनी दिला. यावर उत्तरादाखल '24 जून 2017 रोजी दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सुरजमल विहार भागात हा प्रकार घडला' असं मोहितने कळवलं.

https://twitter.com/dtptraffic/status/879599081198309376

https://twitter.com/mohit_news24/status/879619478757163008

दिल्ली पोलिस ढिंच्यॅक पूजाविरोधात कोणती कारवाई करणार, हे पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सेलिब्रेटी असो वा सामान्य माणूस, पोलिसांनी सर्वांना समान न्याय दिल्याचं पाहून अनेकांना दिलासा मिळाला.