Dharmendra Comeback : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) रुपेरी पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा सिनेसृष्टीत जोरदार कमबॅक केलं आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमात धर्मेंद्र महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 


धर्मेंद्र यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. बॉबी देओलदेखील (Bobby Deol) आपल्या वडिलांचा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहे. याबद्दल बोलताना बॉबी देओल म्हणाले, "बाबा जेव्हा सिनेमाच्या शूटिंगसाठी घराबाहेर जातात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक असते. त्यांच्या सिनेमाची मी वाट पाहतोय."


धर्मेंद्र यांच्या कमबॅकबद्दल बॉबी देओल म्हणाले...


बॉबी देओल पुढे म्हणाले, "वयाच्या 87 व्या वर्षी काम करताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. या वयात काम मिळणं आणि ते करणं ही सोपी गोष्ट नाही. पण उत्तम कलाकार, चांगल्या दिग्दर्शकांसोबत आणि निर्मात्यांसोबत ते काम करत आहे. त्यांचा प्रत्येक दिवस हा वेगळाच असतो. आता पुन्हा एकदा सिनेमात त्यांच्या अभिनयाची जादू पाहण्यास मी उत्सुक आहे". 


धर्मेंद्र यांचा 'यमला पगला दीवाना-फिर से' हा सिनेमा 2018 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात से बॉबी देओलसोबत दिसले होते. या सिनेमानंतर त्यांनी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. आता पुन्हा एकदा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या बहुचर्चित सिनेमाच्या माध्यमातून ते रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहेत. 


धर्मेंद्र यांची गेल्या काही दिवसांपूर्वी 'ताज:डिवायडेड बाय ब्लड' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 10 भागांच्या या वेबसीरिजमध्ये त्यांनी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांची भूमिका साकारली होती. या वेबसीरिजमध्ये अपरिचित असलेला मुघल इतिहास दाखवण्यात आला आहे. 


धर्मेंद्र यांनी 'अॅक्शन हीरो' म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासोबत ते रोमॅंटिक सिनेमांचा बादशाहदेखील आहेत. त्यांनी 1960 साली 'दिल भी तेरा हम भी तेरे' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमांत काम केलं. त्यांच्या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. 


धर्मेंद्र यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' कधी होणार रिलीज? 


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात धर्मेंद्र यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंहदेखील (Ranveer Singh) महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Happy Birthday Dharmendra : एव्हरग्रीन, अॅक्शन हीरो धर्मेंद्र; सिनेसृष्टीत यश न मिळाल्याने मायानगरी सोडण्याचा घेतला होता निर्णय