Dhanush: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता धनुष (Dhanush) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. तो सध्या त्याच्या आगामी कॅप्टन मिलर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. धनुषचा मुलगा आणि रजनीकांत (Rajinikanth) यांच्या नातवाबाबत एक बातमी समोर येत आहे. धनुषच्या मुलाला पोलिसांनी दंड ठोठावला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात...
वाहतूक नियमांचे केले उल्लंघन
चेन्नई पोलिसांनी यात्रा राजावर वाहतुकीचे नियम मोडल्याचा आरोप केला आहे. यात्रेला चेन्नईच्या रस्त्यावर हेल्मेट आणि लायसन्सशिवाय बाइक चालवताना पकडण्यात आलं. त्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल धनुषच्या मुलाकडून 1000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दंड वसूल करण्यासाठी पोलीस अधिकारी धनुषच्या घरी गेले. धनुषच्या मुलाची ही बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. यात्राचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना दिसत आहे.
धनुषला लिंगा आणि यात्रा ही दोन मुलं आहेत. धनुष आणि ऐश्वर्यानं 2004 मध्ये लग्न केले. पण लग्नाच्या 18 वर्षानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी दोघांचा घटस्फोट झाला.
धनुषचे आगामी चित्रपट
धनुष हा कॅप्टन मिलरमध्ये या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, हा चित्रपट 2024 ला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. अरुण माथेश्वरन दिग्दर्शित या चित्रपटात प्रियंका मोहन, शिवराजकुमार आणि संदीप किशन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.'कॅप्टन मिलर' सोबतच धनुषच्या 'तेरे इश्क में' या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. द ग्रे-मॅन या हॉलिवूड चित्रपटात देखील धनुषनं काम केलं. धनुष हा काही दिवसांपूर्वी 'वाथी' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता धनुषच्या 'कॅप्टन मिलर' आणि 'तेरे इश्क में' या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.दिग्दर्शक आनंद एल राय यांनी 'तेरे इश्क में' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Captain Miller Teaser Out: 'कॅप्टन मिलर' चा जबरदस्त टीझर रिलीज; धनुषच्या लूकवरुन नजर हटणार नाही