Captain Miller Teaser Out: साऊथ सुपरस्टार धनुषचा (Dhanush) आज वाढदिवस आहे. धनुषचे अनेक चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. आज धनुषच्या चाहत्यांना एक गिफ्ट मिळालं आहे. धनुषच्या 'कॅप्टन मिलर' (Captain Miller) या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये धनुष हा हटके लूकमध्ये दिसत आहे.


'कॅप्टन मिलर' या चित्रपटाच्या टीझरमध्ये धनुषचा अॅक्शन अंदाज दिसत आहे. या एक मिनिट 33 सेकंदाच्या टीझरमध्ये धनुषचा रावडी लूक दिसत आहे. टीझरमध्ये दिसते की, कॅप्टन मिलर हा ब्रिटीश सैन्याच्या दृष्टीने एक गुन्हेगार आहे. 


कधी रिलीज होणार 'कॅप्टन मिलर'?


अरुण माथेश्वरन यांनी 'कॅप्टन मिलर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी त्यांनी 'रॉकी' आणि 'सानी कायधाम' यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. हा चित्रपट 15 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.






'कॅप्टन मिलर'  ची स्टार कास्ट



'कॅप्टन मिलर' या चित्रपटात धनुषसोबतच सुदीप किशन, नासर, एलंगो कुमारवेल, एडवर्ड सोनेनब्लिक, विजी चंद्रशेखर, निवेदिथा सतीश, जॉन कोककेन, विनोथ किशन, बाला सरवनन, सुमेश मूर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी धनुषनं त्याच्या 'कॅप्टन मिलर' या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर केला होता. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.






'कॅप्टन मिलर'  सोबतच धनुषच्या 'तेरे इश्क में' या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक खास व्हिडीओ देखील धनुषनं शेअर केला होता. दिग्दर्शक आनंद एल राय  यांनी 'तेरे इश्क में' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 


धनुषचे आगामी चित्रपट 


 द ग्रे-मॅन या हॉलिवूड चित्रपटात देखील धनुषनं काम केलं. धनुष हा काही दिवसांपूर्वी 'वाथी' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता धनुषच्या 'कॅप्टन मिलर' आणि 'तेरे इश्क में' या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Dhanush Hindi Film: 'इस बार शंकर को कैसे रोकोगे?' धनुषच्या नव्या चित्रपटाची घोषणा; अभिनेत्यानं शेअर केला खास व्हिडीओ