Dhanush : अभिनेता धनुषनं (Dhanush) दाक्षिणात्य चित्रपसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. धनुष त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. आता धनुष हा लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. धनुष हा द ग्रे मॅन (The Gray Man) या रुसो ब्रदर्सच्या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. द ग्रे मॅन  हा चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज होणार आहे. 


इवांस, रयान गोसलिंग, एना डे अरमास, रेगे-जीन पेज हे हॉलिवूड कलाकार द ग्रे मॅन या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण आहेत. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी चित्रपट निर्मात्यांनी एक प्रोमो  व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनुष हा अॅक्शन सीन करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये  रयान गोसलिंगसोबत धनुष फाइट करताना दिसत आहे. द ग्रे मॅन हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 22 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 


रविवारी पहिले स्क्रिनिंग लॉस एंजेलिस (LA) येथे झाले आहे. या स्क्रिनिंगनंतर अनेकांनी धनुषच्या अभिनयाचं कौतुक केलं. द ग्रे मॅनचे दिग्दर्शन रुसो ब्रदर्स यांनी केलं आहे. रुसो ब्रदर्स यांनी एव्हेंजर्स: एन्डगेमचे दिग्दर्शन देखील केले आहे. द ग्रे मॅनच्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित राहिलेले चित्रपट निर्माते जेफ इविंग यांनी धनुषबाबत एक ट्वीट शेअर केले. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, 'धनुषनं रॉक केलं आहे. त्यानं चांगलं काम केलं आहे. जर या चित्रपटाचा सिक्वेल झाला तर मला हा चित्रपट पुन्हा बघायला आवडेल.'  रिपोर्टनुसार, धनुषचा स्क्रिन टाईम या चित्रपटामध्ये कमी आहे पण कमी वेळेतच धनुष त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडेल. 






धनुषचे चित्रपट


अभिनेता असण्यासोबतच  धनुष हा निर्माता, दिग्दर्शक आणि पार्श्वगायक देखील आहे. त्यानं 46 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. धनुषनं दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा अतरंगी रे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात धनुषसोबतच अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री सारा अली खान यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. 


हेही वाचा:


Dhanush : चित्रपटाचा हीरो पण सेटवरील लोक म्हणत होते रिक्षावाला; बॉडी शेमिंगमुळे धनुषला झाले होते अश्रू अनावर