मुंबई : जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांची प्रमुख भूमिका असलेला 'धडक' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पदार्पणात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने 8.71 कोटी रुपयांची कमाई केली आहे. वरुण धवन, आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा डेब्यू सिनेमा असलेल्या 'स्टूडंट ऑफ द ईयर'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा (8 कोटी) जास्त आहे.

सिनेमाने शुक्रवारी 8.71 कोटी, शनिवारी 11.04 कोटी आणि रविवारी 13.92 अशी मिळून एकूण 33.67 कोटी रुपयांची कमाई केली. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.


'धडक'चं बजेट सुमारे 55 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. जाणकारांच्या मते, सध्या बॉक्स ऑफिसवर कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे काही आठवडे तरी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्याची संधी आहे.

'धडक' हा मराठीतील सुपरहिट चित्रपट 'सैराट'चा अधिकृत रिमेक आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने 'धडक'ची निर्मिती केली आहे. तर शशांक खेतानने चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. 22 जुलै रोजी 'धडक' देशभरात प्रदर्शित झाला.