प्रियांकाचे आई-वडिल दोघेही भारतीय लष्करात डॉक्टर म्हणून कार्यरत होते. 15 वर्षांची असल्यापासून प्रियांका अमेरिकेत आपल्या काकीसोबत राहत होती.
2002 मध्ये ‘थमिझान’ या तामिळ चित्रपटातून तिने अभिनयाची सुरुवात केली. 2003 साली ‘अंदाज’ मधून तीने बॉलिवूड डेब्यू केला. तर याच वर्षी तिने 2003 मध्ये ‘द हिरो- लव स्टोरी आॅफ ए स्पाय’मध्ये सनी देओल बरोबर काम केले.
2004 मध्ये ‘ऐतराज’ मधील नीगेटीव्ह रोलने प्रियांकाला ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘वक्त’, ‘बल्फ मास्टर’, ‘टॅक्सी नंबर 9211’, ‘डॉन’, ‘दोस्ताना’, ‘डॉन2’, ‘बर्फी’ यांसारख्या अनेक चित्रपटात प्रियांकाने काम केले. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘काशी बाईं’चा रोल प्रियांकाने उत्तम पद्धतीने साकारला.
अमेरिकन टीव्ही शो 'क्वाँटिको'साठी प्रियांकाला 'पिपल्स चॉइस' पुरस्कार मिळाला आहे. 'क्वाँटिको'नंतर प्रियांकाने 'बेवॉच' या पहिला हॉलिवूड चित्रपटात काम केले.
प्रियांकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार तर फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर 15 वर्षांत हॉलिवूडपर्यंत मजल मारली.
यावर्षी प्रियांका आपला वाढदिवस कथित बॉयफेन्ड निक जोनाससोबत न्यूयॉर्कमध्ये साजरा करत असल्याचे समजते आहे.