दीपिकाचा एक्स निहार पांड्याचं कंगनासोबत बॉलिवूड पदार्पण
एबीपी माझा वेब टीम | 02 Nov 2017 08:42 PM (IST)
रणबीर कपूर, रणवीर सिंग, सिद्धार्थ माल्ल्या यांच्यासोबत दीपिकाचं नाव जोडलं जाण्यापूर्वी निहार आणि दीपिका एकमेकांच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जातं
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेण्ड निहार पांड्या लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'क्वीन' कंगना राणावतच्या आगामी 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटात निहार झळकणार आहे. मॉडेलिंगच्या काळात दीपिका आणि निहार रिलेशनशीपमध्ये होते. रणबीर कपूर, रणवीर सिंग, सिद्धार्थ माल्ल्या यांच्यासोबत दीपिकाचं नाव जोडलं जाण्यापूर्वी ते एकमेकांच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जातं. दीपिकाने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं, मात्र गेल्या दहा वर्षात निहारचं नाव कुठेच दिसलं नाही.