जवळपास पंधरा दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण बरीच चर्चेत आली होती. एनसीबीने अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तिला अमली पदार्थाच्या चौकशीसाठी बोलावणं धाडलं आणि देशभरातल्या माध्यमांमध्ये एकच हेडलाईन झळकली. ती होती, दीपिका पदुकोणला एनसीबीची नोटिस.


´गांधी´साठी सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनरचा ऑस्कर जिंकणार्‍या भानू अथैय्या यांचं निधन


त्या प्रकारानंतर पुढचा आठवडा दीपिका, श्रद्धा, सारा यांच्याभवतीच होता. त्यावेळी दीपिका कशी गोव्यात होती. तिला भेटायला तिची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे लोक कसे गोव्यात गेले होते. ती कशी आपण अमली पदार्थ कधी काळी सेवन केल्याची कबुली देणार आहे अशा अनेक गोष्टी आल्या. त्यानंतर ठरल्याप्रमाणे दीपिका गोव्यातून परतली. एनसीबीच्या चौकशीला सामोरी गेली. आता त्यालाही दहा दिवस उलटून गेले. चौकशीनंतर दहा दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर ही नायिका पुन्हा एकदा गोव्यात आपल्या चित्रिकरणासाठी सज्ज झाली आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित एका चित्रपटात ती काम करत असून त्यात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हे कलाकारही आहेत.


कॅन्सर उपचारानंतर संजय दत्तने दाखवली नवीन खूण! म्हणाला.. लवकरच कॅन्सरवर मात करणार


दहा दिवसांनंतर आणि त्यातही एनसीबीच्या चौकशीनंतर दीपिका जेव्हा पुन्हा एकदा चित्रिकरणासाठी गोव्यात आली आणि लोकेशनवर पोचली तेव्हा तिचं स्वागत करण्यात आलं. तिने पहिल्याच दिवशी अगदी साधा, लाईट हार्टेड सीन दिला. शकुन यांच्या या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नसून, या सिनेमात तीन मित्रांची गोष्ट आहे. ते एका प्रवासाला निघतात आणि त्यातून उलगडणारे नातेसंबंध या सिनेमात असणार आहेत. हा चित्रपट खरंतर फेब्रुवारी 2021 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. पण आता चित्रिकरण लांबल्यामुळे याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.


Bollywood drug probe | दीपिका, सारा, श्रद्धाचे मोबाईल केले जप्त; तपासणीसाठी फॉरेन्सिकला पाठवणार