Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही ऑस्कर-2023 (Oscars 2023) पुरस्कार सोहळ्यात अवॉर्ड प्रेजेंट करणार आहे. दीपिका ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबईहून अमेरिकेला गेली आहे. दीपिकाचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दीपिका ही एअरपोर्टवरील गेटवर जाण्यापूर्वी फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.
दीपिकाचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल
ऑस्कर सोहळ्यासाठी निघालेल्या दीपिकाचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दीपिका कारमधून उतरुन एअरपोर्टच्या गेटवर जाताना दिसत आहे. यावेळी दीपिकाने ब्लू पँट, ब्लॅक हिल, चष्मा आणि ब्लेजर असा लूक केला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये दीपिकाकडे ब्लॅक कलराची हँड बॅग देखील दिसत आहे. दीपिकाच्या मुंबई विमानतळावरील व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'नैना तलवार' तर दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केली, 'अभिमानास्पद क्षण लवकरच बघायला मिळणार आहे.'
पाहा व्हिडीओ:
प्रेजेंटर्सच्या यादीत दीपिकाचं नाव
ऑस्कर-2023 पुरस्कार सोहळ्यातील प्रेजेंटर्सच्या यादीत दीपिकाचं नाव आहे. याबाबत दीपिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सर्व प्रेजेंटर्सची नावं दिसत आहेत. 'ऑस्कर 2023' च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणसह ड्वेन जॉनसन, मायकल बी जॉर्डन, रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, ट्रॉय कोत्सुर, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल जॅक्सन, मेलिसा कॅककार्थी, जो सलदाना, डॉनी येन, जोनाथन मेजर्स आणि क्वेस्टलोव या सेलिब्रिटींचाही समावेश आहे. दीपिका ही ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रेजेंटर म्हणून उपस्थित राहणार आहे, ही कौतुकाची बाब आहे.
दीपिकाचे चित्रपट
दीपिकाचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. जगभरात या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. दीपिकाचा 'फायटर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तिचा 'प्रोजेक्ट के' हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रभास हा देखील या चित्रपटात काम करणार आहे. 'प्रोजेक्ट के' या सिनेमात दीपिका बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: