मी रणवीरला डेट करणार : दीपिका पदुकोण
एबीपी माझा वेब टीम | 19 Nov 2017 10:12 PM (IST)
पद्मावती सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका बिग बॉसच्या सेटवर आले होते. यावेळी तिने रणवीरला डेट करणार असल्याचं सांगितलं.
मुंबई : दीपिका पदुकोणचा 'पद्मावती' सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असला, तरी दीपिका सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका बिग बॉसच्या सेटवर आले होते. यावेळी तिने रणवीरला डेट करणार असल्याचं सांगितलं. बिग बॉसच्या शोदरम्यान, सलमानने दीपिकाला विचारलं की, "तू लग्न कुणाशी करणार, आणि डेटिंगवर कुणासोबत जायला आवडेल, तसेच तुला मारायचं झाल्यास कुणाला मारशील," असे विचित्र प्रश्न विचारले. त्याला उत्तर देताना दीपिकाने झटक्यात सांगितले की, "मी संजय लीला भन्साळी सोबत लग्न करेन, रणवीरसोबत डेटिंगला जाईन, आणि शाहिद कपूरचं लग्न झालं असल्याने, त्याला मारेन." बिग बॉसच्या या शोचा प्रमोशनल व्हिडीओ शोच्या ऑफिशयल हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर दीपिकाच्या उत्तरावर अनेक कमेंट येत आहेत. व्हिडीओ पाहा