Deepika Padukone :  बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री  दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आई होणार आहे. रणवीर-दीपिका हे सेलिब्रिटी कपल सप्टेंबर महिन्यात आई-बाबा होणार आहेत. दीपिका सध्या गरोदर असली तरी काही चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये ती झळकणार आहे. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणात दीपिका व्यस्त आहे. 'सिंघम अगेन'च्या सेटवर दीपिका बेबी बंपसह दिसली. 


रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या चित्रपटात दीपिका पदुकोण 'लेडी सिंघम'च्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये तिचा एक लुक समोर आला होता. त्यात पोलिसांच्या गणवेशात रक्ताच्या थारोळ्यात दिसली होती. चित्रपटाच्या सेटवर दीपिका पोलिसांच्या गणवेशात दिसली. सध्या दीपिकाचे सेटवरील फोटो व्हायरल होत आहे.  






बेबी बंपसह दिसली दीपिका


व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये दीपिका पदुकोणचा बेबी बंप दिसत आहे. अशा फिट कपड्यांमध्ये अभिनेत्री दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. लोकांचे लक्ष फक्त पोटाकडे जाते. या चित्रपटाच्या ॲक्शन सीनच्या शूटिंगसाठी ती सेटवर पोहोचली होती. त्यावेळी हा फोटो घेण्यात आला. 


दीपिकाचा फोटो व्हायरल 


 










या चित्रपटातील दीपिका पदुकोण साकारत असलेल्या व्यक्तीरेखेचे नाव शक्ती शेट्टी आहे. अंगावर पोलिसांचा खाकी गणवेश, डोळ्यावर काळा गॉगलच्या लूकमध्ये ती स्पॉट झाली. दीपिकाच्या आजूबाजूला दिग्दर्शक आणि क्रू मेंबर आहेत. यामध्ये ती टीम मेंबर्स आणि रोहित शेट्टी यांच्याकडून सूचना घेत आहे. त्याच वेळी, सेटवर एक महिला देखील आहे, स्टंट डबलसारखी दिसते. ही बॉडी डबल दीपिकाच्या ऐवजी काही सीनमध्ये दिसणार आहे.