मुंबई: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षीत पद्मावती सिनेमाच्या समर्थनार्थ, खुद्द पद्मावती अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण मैदानात उतरली आहे.


पद्मावती सिनेमा प्रदर्शित होणारच आणि त्याला कुणीही थांबवू शकत नाही, असं सिनेमात पद्मावती साकारणाऱ्या दीपिका पदुकोणने म्हटलं आहे.

“सिनेमा प्रदर्शित होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधिल आहोत”, असं दीपिकाने म्हटलं आहे.

एक महिला म्हणून या सिनेमाचा भाग असणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, या सिनेमाची कहाणी सांगणं हे आवश्यक आहे, असंही दीपिका म्हणाली.

आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?

ठरल्यानुसार 1 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होईलच, असा विश्वास दीपिकाने व्यक्त केला आहे.

‘पद्मावती’ला विविध संघटनांचा विरोध

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमाला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. आधी भन्साली निर्मात्यांचा शोध घेत होते. यानंतर जयपूरमध्ये शूटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्सालींना मारहाणही करण्यात आली होती.

महाराणी पद्मावतीवर आधारित या सिनेमाची कथा आहे. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती.

राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तसंच या सिनेमातून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.

सिनेमात कोणाची काय भूमिका?

पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.

दिल्लीचा शक्तिशाली सुलतान असलेल्या अल्लाउद्दिन खिल्जीचा जीव राणी पद्मावतीवर जडला होता. या प्रेमातूनच त्याने तिच्या राज्यावर हल्लाबोल केला होता. मात्र त्याला शरण जाण्याऐवजी पद्मावतीने देहत्याग करणं पसंत केलं.

आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?


खिल्जी हा बायसेक्शुअल असल्याचं इतिहासाच्या पुस्तकात म्हटलं आहे. मुख्य सल्लागार असलेल्या मलिक काफूरवरही खिल्जीचं प्रेम होतं. गुजरातहून हजारो सुवर्णमुद्रा देऊन खिल्जीने एका तरुणाला विकत घेतलं. हाच तरुण भविष्यात मदुराईवर हल्ला करणारा सेनापती झाला, असं देवदत्त पटनाईकांनी लिहिल्याचं म्हटलं आहे.

दीपिका पदुकोण पद्मावतीची व्यक्तिरेखा साकारत असून शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.

संबंधित बातम्या

‘पद्मावती’ सिनेमावर महाराष्ट्रात बंदी आणा : भाजप आमदार

'पद्मावती' वाद : संपूर्ण बॉलिवूड भन्साळींच्या समर्थनार्थ मैदानात

आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती? 

जयपूरमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना मारहाण