Deepika Padukone and Katrina Kaif: यशराज फिल्म्सने हिंदी फिल्म इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. काही स्पाय थ्रिलर चित्रपटाची निर्मिती देखील यशराज  फिल्म्स बॅनरने केली आहे. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची निर्मिती देखील  यशराज फिल्म्सनं केली. आता यशराज  फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांची एन्ट्री झाली आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. यशराज फिल्म्स  हे लवकरच फिमेल सेंट्रिक स्पाय फिल्मची निर्मिती करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय फिल्ममध्ये दीपिका आणि कतरिनाला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण याबाबत यशराज फिल्म्सनं कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 


एका सोशल मीडियावरील अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे,'यशराज फिल्म्स हे बिग बजेट फिमेल सेंट्रिक स्पाय फिल्मची निर्मिती करणार आहेत. यामध्ये दीपिका आणि कतरिना या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार आहेत.' या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 






नेटकऱ्यांच्या कमेंट्स


सोशल मीडियावरील पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'या चित्रपटात रणबीर कपूरला व्हिलनची भूमिका द्या, चित्रपट हिट होईल.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, या चित्रपटात आलियाचा कॅमिओ रोल असावा.'









यशराज फिल्म्सनं एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठाण या स्पाय चित्रपटांची निर्मिती केली.  या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता  यशराज फिल्म्सच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सकतेने वाट बघत आहेत. यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्समधील वॉर 2 (War 2), टाइगर 3, (Tiger 3), टाइगर वर्सेज पठाण (Tiger Vs Pathaan) हे  चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.


कतरिना आणि दीपिकाचे आगामी चित्रपट


दीपिकाचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आता दीपिकाचा 'फायटर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर  कतरिनाचा टायगर-3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Yash Raj Films Spy Universe: पठाणनंतर आता यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील 'हे' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; नावं माहितीयेत?