De Dhakka 2 : 'दे धक्का' हा सिनेमा 2008 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी आजही आवडीने प्रेक्षक हा सिनेमा पाहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाने म्हणजेच 'दे धक्का 2' (De Dhakka 2) या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर होणार आहे. 


'दे धक्का 2' हा सिनेमा झी टॉकीजवर सिनेरसिकांना 20 नोव्हेंबरला रविवारी दुपारी 12 आणि संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळणार आहे. ‘दे धक्का 2’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे. अमेय खोपकर यांच्या बॅनर खाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये करण्यात आले आहे. 


'दे धक्का 2' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली. सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्डदेखील झळकले होते. 'दे धक्का 2' मधील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.  


‘दे धक्का 2’चे  चाहते आता पुन्हा एकदा  त्यांच्या लाडक्या मकरंद जाधव, सुमती जाधव,  धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसनाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. काही मराठी सिनेमे सिने-रसिक कितीही वेळा आवडीने पाहतात. या यादीत दे धक्का या सिनेमाचा समावेश आहे. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 






यंदा होणार थेट ‘लंडन’वारी!


दे धक्काची धमाल ट्रीप मुंबई-कोल्हापूर नाही तर, कोल्हापूर ते थेट लंडन असणार आहे. या सिनेमाच्या पोस्टर, टीझर, ट्रेलरने प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता वाढवली आहे. लंडनची झलक या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. धमाल आणि मनोरंजनाचा मोठा डोस हा सिनेमा प्रेक्षकांना देणार आहे. 


संबंधित बातम्या


De Dhakka 2 : ‘आज पंढरीची वारी, 5 ऑगस्टला लंडनवर स्वारी!’, ‘दे धक्का 2’चं नवं पोस्टर पाहिलंत का?