मुंबई : अभिनेता आमीर खानच्या 'दंगल'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरु आहे. दुसऱ्याच आठवड्यात या सिनेमाने 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्याचा विक्रम नोंदवला आहे. आतापर्यंत 'दंगल'ने भारतात 239 कोटी रुपयांची कमाई केली आहे.


'दंगल' आजच्या कमाईसह 250 कोटी क्लबमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर 'दंगल'ने परदेशातही आतापर्यंत 131 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/815472236530319360

'दंगल'ने पहिल्या दोन दिवसात 50 कोटी, तिसऱ्या दिवशी 100 कोटी, पाचव्या दिवशी 150 कोटी आणि आठव्या दिवशी 200 कोटी रुपये अशी कमाई केली आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/815472941114634244

याच वेगाने कमाई सुरु राहिल्यास दंगल लवकरच 300 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. असं झाल्यास हा सिनेमा 300 कोटींची कमाई करणारा चौथा सिनेमा असेल. यापर्वी आमीरच्याच 'पीके', सलमान खानच्या 'सुलतान' आणि 'बजरंगी भाईजान' या सिनेमांनी 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/815068590458028032