दंगल हा सिनेमा कुस्तीपटू महावीरसिंह फोगट यांच्यावर आधारित आहे. यापूर्वी सलमान खाननेही कुस्तीवर आधारित सुलतान हा सिनेमा केला होता.
मात्र आता स्वत: सलमानने सुलतानपेक्षा दंगल उत्कृष्ट असल्याची पावती दिली आहे.
दंगलच्या स्क्रीनिंगला सलमान खानच्या कुटुंबाने हजेरी लावली. त्यानंतर सलमानने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
"माझं कुटुंब दंगल पाहण्यास गेलं होतं. त्यांच्या मते सुलतानपेक्षा दंगल खूपच चांगला सिनेमा आहे. आमीर तू वैयक्तिक जीवनात मला आवडतोस, मात्र व्यावसायिक जीवनात मी तुझा तिरस्कार करतो" असं ट्विट सलमानने केलं.
यावर आमीर खाननेही त्याच्या स्टाईलने सलमानला रिप्लाय दिला. आमीरने 'देल्ली बेल्ली' गाण्याचा आधार घेत, तुझ्या तिरस्कारातही मला प्रेम दिसतं. आय लव्ह यू लाईक आय हेट यू'
दंगल या सिनेमात आमीर खानशिवाय सांक्षी तन्वर, फातिमा सना शेख, सानिया मल्होत्रा आणि जायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत.
या सिनेमाला समीक्षकांनी भरभरुन स्टार्स दिले आहेत. एबीपी माझानेही दंगलला पाचपैकी चार स्टार दिले आहेत.