मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या दंगल सिनेमानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. दोनच आठवड्यात दंगलनं 300 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. विशेष म्हणजे अजूनही तिकीटबारीवर दंगल हाऊसफुल आहे.

पुढच्या आठवड्यातही दंगल विक्रमी घोडदौड कायम ठेवण्याची शक्यता आहे. 23 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमात आमीर खान कुस्तीपटू महावीर फोगाट यांच्या भूमिकेत आहे. गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांच्या संघर्षावर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

‘दंगल’ सिनेमाने पहिल्या दिवशी 29.78 कोटी, दुसऱ्या दिवशी 34.82 कोटी, तिसऱ्या दिवशी 42.41 कोटी, चौथ्या दिवशी 25.69 कोटी, पाचव्या दिवशी 23.09 कोटी, सहाव्या दिवशी 21.46 कोटी, सातव्या दिवशी 20.29 कोटी, आठव्या दिवशी 18.59 कोटी, नवव्या दिवशी 23.07 कोटी, आणि दहाव्या दिवशी 32.04 कोटी, अकराव्या दिवशी 13.45 कोटींची कमाई केली. सिनेमा ट्रेड अनॅलिस्ट तरन आदर्श यांनी ट्वीट करुन दंगलच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत.

‘दंगल’ने प्रदर्शनापासून बॉक्स ऑफिसवर तीनच दिवसात 100 कोटीचा गल्ला गोळा केला होता. कमी दिवसात हा टप्पा पार करणारा आमीरचा हा पाचवा सिनेमा असून 2014 मधील ‘पीके’, 2013 मधील ‘धूम-2’, 2009 मधील ‘थ्री इडियटस’ आणि 2008 मधील ‘गजनी’ने हा विक्रम रचला होता. दंगलने भारतात अकरा दिवसांमध्ये 284.69 कोटी रुपये जमवले असून देशाबाहेरील कमाईचा आकडा 154 कोटी इतका आहे. एकूण कमाई 438 कोटी रुपयांच्या पार असून पाचशे कोटींच्या दिशेने दंगलची वाटचाल सुरु आहे.

‘दंगल’ची भारतातील आतापर्यंतची कमाई :

  • शुक्रवारी (पहिला दिवस) – 29.78 कोटी

  • शनिवार (दुसरा दिवस) – 34.82 कोटी

  • रविवार (तिसरा दिवस) – 42.41 कोटी

  • सोमवार (चौथा दिवस) – 25.69 कोटी

  • मंगळवार (पाचवा दिवस) – 23.09 कोटी

  • बुधवार (सहावा दिवस)- 21.46 कोटी

  • गुरुवार (सातवा दिवस)- 20.29 कोटी

  • शुक्रवार (आठवा दिवस)- 18.59 कोटी

  • शनिवार (नववा दिवस)- 23.07 कोटी

  • रविवार (दहावा दिवस)- 32.04 कोटी

  • सोमवार (अकरावा दिवस)- 13.45 कोटी

  • अकरा दिवसात एकूण – 284.69 कोटी रुपये