अभिनेता अर्जुन रामपाल या चित्रपटात मुख्य भूमिकेत म्हणजेच अरुण गवळीच्या भूमिकेत आहे. यापूर्वी अरुण गवळीच्या आवाजातला ऑडिओ टीझर आणि मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. त्यानंतर आता गाणंही रिलीज करण्यात आले आहे.
अर्जुन रामपालने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन #AalaReAalaGanesha या हॅशटॅगसोबत हे गाणं रिलीज केलं. प्रशांत इंगोले आणि साजिद यांनी गीतलेखन केलं असून, साजिद-वाजिद यांनी संगीत दिलं आहे.
दरम्यान, येत्या 8 सप्टेंबर रोजी ‘डॅडी’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
पाहा व्हिडीओ :