September OTT Release :  सध्या प्रेक्षकांना सस्पेंस, थ्रिलर आणि अ‍ॅक्शन असणारे चित्रपट आणि वेब सीरिज आवडतात. ओटीटीवरील वेब सीरिज आणि चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. नेटफ्लिक्स (Netflix) ,सोनी लिव्ह (Sony Liv), हॉटस्टार (Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही घरबसल्या चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता. ओटीटीवरील या वेब सीरिज आणि हे चित्रपट तुमचे मनोरंजन करतील. जाणून घेऊयात सप्टेंबरमध्ये ओटीटीवर रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सीरिज...


कठपुतली (Cuttputlli)
दोन सप्टेंबर रोजी अक्षय कुमारचा कठपुतली हा चित्रपट रिलीज झाला. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट रतसानन या साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे. 


खुदा हाफिज-2 (Khuda Haafiz: Chapter 2)
अभिनेता विद्युत जामवालचा खुदा हाफिज-2 हा चित्रपट 2 सप्टेंबर रोजी ओटीटीवर रिलीज झाला. हा चित्रपट तुम्ही झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या चित्रपटामध्ये विद्युत जामवालसोबतच शिवालिका ओबेरॉय देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, स्नेहा बिमल पारेख, राम मिरचंदानी यांनी खुदा हाफिज 2 या चित्रपटाची  निर्मिती केली आहे.  


थॉर लव्ह अँड थंडर (Thor: Love and Thunder)
हॉलिवूडमधील सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थ याचा सुपरहिट थॉर लव्ह अँड थंडर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट 8 सप्टेंबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. प्रेक्षक हा चित्रपट ओटीटीवर हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये पाहू शकतात.


द रिंग्स ऑफ पावर (The Lord of the Rings: The Rings of Power)
द लॉर्ड ऑफ द रिंग्स या सीरिजचा द रिंग्स ऑफ पावर हा भाग ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा हॉलिवूडचा प्रसिद्ध शो अॅमेझॉन प्राइमवर प्रेक्षक पाहू शकतात. 


विक्रांत रोना (Vikrant Rona)
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुदीप किच्चा याच्या विक्रांत रोना या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात सुदीप किच्चा याच्यासोबतच जॅकलीन फर्नांडिसनं देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 


फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलिवूड वाइव्स 2 (Fabulous Lives of Bollywood Wives: Season 2 )
नेटफ्लिक्सची प्रसिद्ध वेब सीरिज फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलिवूड वाइव्सचा दुसरा सिझन दोन सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री नीलम कोठारी, महीप कपूर, सीमा खान आणि भावना पांडे यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Brahmastra : 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर सुस्साट! दमदार कलेक्शनमुळे पीव्हीआर आणि आयनॉक्सच्या शेअर्समध्ये वाढ!