मालेगाव : अभिनेता सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ सिनेमाचा शो सुरु असताना थिएटरमध्ये फटाके फोडल्याचा प्रकार मालेगावात घडला. सिनेमात गाणं सुरु झाल्यावर सलमानच्या चाहत्यांनी गोंधळ सुरु केला आणि भर थिएटरमध्येच फटाके फोडले.


मालेगावातील थिएटरमध्ये काल रात्री हा सर्व प्रकार घडला. या प्रकारानंतर थिएटर मालकाने तातडीने पोलिसांना कळवलं. त्यानंतर फटाके फोडणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

काल ईदची सुट्टी होती, त्यामुळे सलमानचा ‘ट्युबलाईट’ सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मालेगावात सलमान खानचा चाहतावर्ग मोठा आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारादरम्यान थिएटरमधील इतर प्रेक्षकांना त्रास सहन करावा लागला. मात्र, सुदैवाने कुणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

पाहा व्हिडीओ :